अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक नाही ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना, कोल्हापूर
कोल्हापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – या अर्थसंकल्पातील रिझर्व्ह बँकेच्या वतीने ‘डिजिटल’ चलन चालू करण्यासंबंधीचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी अनपेक्षित गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरू शकतो. ‘डिजिटल’ चलन हे पूर्णपणे घातक किंवा जुगारी स्वरूपाचे ठरू शकते. आभासी स्वरूपात दिसणार्या या चलनाचे व्यवस्थापन करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत पुस्तकी ‘अकाउंटिंग एंट्रि’ असणार्या ‘डिजिटल करन्सी’चे व्यवस्थापन कसे करणार ? नोटबंदीप्रमाणे अर्थव्यवस्थेला हा निर्णय घातक ठरू शकतो. त्यामुळे अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे.
संजय मंडलिक पुढे म्हणाले, ‘‘सहकारी अर्थकारणाला प्रोत्साहित करण्यासाठी सहकारी संस्थांच्या उत्पन्नावरचा कर हा १८ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आला आहे. यात अर्थकारण किती आणि समाजकारण किती हे समजून घेणे आवश्यक आहे. समाधानकारक गोष्ट इतकीच आहे की, देशांमधील पायाभूत सुविधा रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक, ‘मेट्रो’ कालवे इत्यादींसाठी जवळपास ७.५ लाख कोटी व्यय केले जाणार आहेत.’’