‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
|
नागपूर – विदेशांमध्ये हलाल औद्योगिक वसाहत, ‘माझमा’ मॉल, हलाल पर्यटन, हलाल जीवनशैली अशा विविध पद्धतींनी हलाल प्रमाणित अर्थव्यवस्था विकसित करण्याचे कार्य प्रचंड वेगाने चालू आहे. ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून व्यापार आणि देशाची अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणे, हे एक जागतिक षड्यंत्र आहे. त्या माध्यमातून भविष्यात भारतातील उद्योजक आणि व्यापारी यांच्यासाठी धोका निर्माण होत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेच्या वतीने १६ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या ऑनलाईन परिसंवादामध्ये ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ याविषयी प्रबोधन करतांना ते बोलत होते. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल’ म्हणजे काय ? ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे काय ? त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय दुष्परिणाम होत आहे ? शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुणालये, गृहसंस्था अशा कोणकोणत्या स्तरांवर ही यंत्रणा कार्यरत आहे आदी सूत्रांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
‘हलाल प्रमाणपत्राच्या या धोक्याविषयी माहिती मिळाल्यामुळे माहेश्वरी समाजातील व्यापारी, उद्योजक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांनी सतर्क होऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद व्हावी’, यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार या वेळी केला. या ऑनलाईन परिसंवादाला महाराष्ट्रातून ३०० हून अधिक व्यापारी आणि उद्योजक जोडले होते. या परिसंवादाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितला.
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “हलाल सर्टिफिकेशन”
_______________________
Read this also –
♦ Why do we need a Religion based parallel Halal economy in Non-religious (Secular) India ? Boycott ‘Halal-certified’ products !- Hindu Janajagruti Samiti https://sanatanprabhat.org/english/20802.html
पदाधिकार्यांचे अभिप्राय१. श्री. शाम सोनी, अखिल भारतीय अध्यक्ष, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा‘हिंदु’ म्हणून अशा मोहिमांमध्ये आम्ही नेहमी पुढे रहाणार आहोत. अशा वेळी आम्ही पद, पक्ष, कोण काय म्हणेल ? याचा विचार करत नाही आणि करणारही नाही. ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी आम्ही पंतप्रधानांना निवेदन देणार आहोत. हिंदु जनजागृती समितीमुळे ‘हलाल अर्थव्यवस्था’ म्हणजे काय ? हे समजले. हिंदु म्हणून आम्ही हिंदुविरोधी कृतींना नेहमीच विरोध केला आहे आणि यापुढेही करू ! २. श्री. रामस्वरूप मुंदडा, संपादक, ‘माहेश्वरी पत्रिका’ आमचा समाज व्यापार आणि उद्योग यांत अग्रेसर आहे, असे मी मानत होतो; मात्र ज्याप्रमाणे या मुस्लिम संस्था त्यांचा कार्यप्रसार बुद्धीचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने वाढवत आहेत, त्यातून आमचे डोळे उघडले. ‘हलाल प्रमाणपत्रा’चा पैसा मुस्लिम बँकेत जातो आणि त्यातून आपल्या (हिंदु) समाजातील लोकांना व्याजमुक्त ऋण देतात. व्याज न घेणारी ही व्यवस्था असल्याने व्यापारी समाजाचे लोक टिकू शकणार नाहीत. या पद्धतीने आपल्या हातातील व्यापार, व्यवसाय आणि उद्योग या तिन्ही गोष्टी निघून जातील. |