पेशावर (पाकिस्तान) येथे एका पाद्य्राची गोळ्या झाडून हत्या, तर दुसरा पाद्री घायाळ
पाकमध्ये अल्पसंख्यांकांचा होणारा वंशसंहार थांबवण्यासाठी जगाने पुढाकार घेणे आवश्यक ! – संपादक
पेशावर (पाकिस्तान) – येथे एका पाद्य्राची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तर दुसरा पाद्री घायाळ झाला. ठार झालेल्या पाद्य्राचे नावा विलियम सिराज आहे, तर घायाळ झालेल्या पाद्य्राचे नाव पॅट्रिक नईम आहे. हे दोघेही चारचाकी वाहनातून चर्चमधून परतत असतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अद्याप या हत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
Pakistan: Christian pastors shot in broad daylight in Peshawar, one pastor dead while another injuredhttps://t.co/2DJXUuM21E
— OpIndia.com (@OpIndia_com) January 30, 2022
पाकमधील प्रोटेस्टंट चर्चचे ज्येष्ठ बिशप आझाद मार्शल यांनी या घटनेची निंदा करत पाकमधील ख्रिस्त्यांची सुरक्षा अधिक भक्कम करण्याची मागणी केली आहे.