व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांच्या दृष्टीकोनांतून देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची संख्या अन् त्यांची मांडणी
सूक्ष्मातील प्रयोग
खाली दिलेल्या देवघराच्या दोन छायाचित्रांकडे बघून मनाला काय जाणवते, याचा प्रयोग करा !
प्रयोग झाल्यानंतर पुढील उत्तर वाचा.
प्रयोगाचे उत्तर : ‘अ’ छायाचित्रापेक्षा ‘आ’ छायाचित्राकडे बघून चांगले वाटते !वर दिलेली दोन्ही छायाचित्रे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराची आहेत. ‘अ’ छायाचित्र १०-१५ वर्षांपूर्वीपासून देवघरात असलेल्या देवतांची १९ चित्रे आणि मूर्ती यांचे आहे. यामध्ये काही देवतांची चित्रे आणि मूर्ती काही संतांनी विशिष्ट कारणांसाठी देवघरात नियमित पूजेसाठी ठेवण्यास सांगितलेली आहेत. ‘आ’ छायाचित्र हे २९.१.२०२२ या दिवशी देवघरात छायाचित्र ‘अ’मधील देवतांची चित्रे आणि मूर्तीं यांच्यासह प्रथमच पूजनासाठी वापरत असलेल्या अष्टदेवतांची चित्रे (नावे पुढे दिली आहेत.) ठेवल्यानंतरचे आहे. ‘आ’ छायाचित्रात, छायाचित्र ‘अ’मधील सर्व देवतांच्या मूर्ती आणि चित्रे यांच्यासह पुढील ८ देवतांची नवीन चित्रे आहेत, म्हणजे एकूण २७ चित्रे आणि मूर्ती आहेत. ८ देवतांची नवीन चित्रे – डावीकडून (छायाचित्र ‘इ’ पहा.) १. शिव, २. श्री गणपति, ३. श्री दुर्गादेवी, तर उजवीकडे (छायाचित्र ‘ई’ पहा.) ४. श्रीकृष्ण, ५. श्रीराम आणि देवघराच्या वर डावीकडून ६. मारुति, ७. दत्त आणि ८. श्री लक्ष्मीदेवी. (छायाचित्र ‘उ’ पहा.) (टीप – देवतांची ही मांडणी त्यांची मूळ रूपे, सहयोगी देवता आणि त्यांचे कार्य यांसारखी काही सूत्रे लक्षात घेऊन केलेली आहे.) ‘अ’ छायाचित्रापेक्षा ‘आ’ छायाचित्राकडे बघून चांगले वाटते. |
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवघरामध्ये देवतांची अनेक चित्रे आणि मूर्ती ठेवण्याचे कारण
‘देवघरामध्ये कमीत कमी देवता, म्हणजे श्री गणपति, कुलदेवता/कुलदेव, गुरु आणि गुरूंनी सांगितलेल्या उपास्यदेवता इतक्याच मूर्ती किंवा चित्रे असावीत’, हा अध्यात्मातील सिद्धांत असतांना अनेक देवता असणारे ‘आ’ छायाचित्रातील देवघर अधिक चांगले का वाटते ? अध्यात्मशास्त्राप्रमाणे ‘अनेकातून एकात जाणे’ झाले पाहिजे; परंतु यामध्ये तर देवतांच्या चित्रांची संख्या का वाढवली आहे ? या प्रश्नांचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
अ. देवघरात व्यष्टी साधनेसाठी कमीतकमी, तर समष्टी साधनेसाठी साहाय्य करणार्या देवतांची चित्रे ठेवावीत : ‘देवघरात किमान देवता असाव्या’, हा वर दिलेला सिद्धांत व्यष्टी साधना करणार्यांसाठी लागू पडतो; पण समष्टी स्तरावरील विविध कार्यांसाठी विविध देवता साहाय्य करत असल्यामुळे देवघरामध्ये संबंधित सर्व देवतांची चित्रे ठेवली आहेत.
आ. सनातनच्या विविध कार्यांसाठी विविध देवतांनी साहाय्य करणे : सनातनचे साधक विविध विषयांच्या संदर्भात सेवा करतात. त्यासाठी त्या त्या विषयाशी संबंधित देवता त्या साधकाला साहाय्य करते. त्याचप्रमाणे सध्याच्या आपत्काळात साधकांना येणार्या अडचणीही वाढल्यामुळे या मुख्य अष्टदेवता आता साधकांच्या साहाय्यासाठी धावून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवघरामध्ये त्यांची स्थापना केली आहे. नेहमी आपण पूजा करतो आणि त्यानंतर देवता साहाय्य करतात. याउलट येथे देवतांनी साहाय्य केल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या चित्रांची स्थापना देवघरात केली आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१.२०२२)
यु.ए.एस्.च्या (‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’च्या) माध्यमातून दिसून आलेली देवतांच्या चित्रांची प्रभावळ, हे त्या त्या देवतांच्या धर्मकार्यातील साहाय्याचे दर्शक !
१. यु.ए.एस्.च्या माध्यमातून लक्षात आलेले देवतांचे साहाय्य
‘देवघरामध्ये ही चित्रे ठेवण्यापूर्वी त्यांचे यु.ए.एस्. केल्यावर त्यांच्यामध्ये पुढील प्रमाणात सकारात्मक स्पंदने असल्याचे लक्षात आले.
यापूर्वी केलेल्या एका संशोधनामध्ये सनातन-निर्मित देवतांच्या त्याच चित्रांमध्ये ४ ते ५ मीटर इतकीच सकारात्मक उर्जा आढळून आली होती. (बाजारात मिळणार्या देवतांच्या अन्य चित्रांमध्ये साधारण १ मीटर किंवा त्यापेक्षा अल्प प्रमाणात सकारत्मक उर्जा असते.) याचा अर्थ मी या देवतांची नियमित उपासना उदा. त्यांची पूजा, नामजप इत्यादी करत नसलो, तरी समष्टी स्तरावरील कार्यासाठी या देवता साहाय्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मकता आली आहे.
२. ‘अ’ आणि ‘आ’ या देवघराच्या दोन छायाचित्रांची यु.ए.एस्. निरीक्षणे
देवघराच्या या दोन मांडणींच्या छायाचित्रांचे ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.
याचा अर्थ छायाचित्र ‘अ’ मधील देवघराच्या पूर्वीच्या मांडणी केवळ माझ्याशी संबंधित असल्यामुळे माझ्यावर होणार्या वाईट शक्तींच्या हल्ल्यांतून प्रक्षेपित झालेली अनिष्ट शक्ती देवघरातील देवतांनी आकर्षित करून घेतल्यामुळे त्यामध्ये नकारात्मक स्पंदने होती. याउलट अष्टदेवतांची मांडणी असणार्या देवघराच्या ‘आ’ छायाचित्रामध्ये नकारात्मक स्पंदने काहीच नसून त्यामध्ये समष्टीसाठी सकारात्मक उर्जा अधिक प्रमाणात कार्यरत आहे. (सर्वसाधारण व्यक्तीमध्ये २-३ मीटर सकारात्मक उर्जा असते.)
३. निष्कर्ष
छायाचित्र ‘अ’ मधील देवतांची मांडणी आणि त्यांची संख्या ही व्यष्टी साधनेच्या दृष्टीकोनातून होती. याउलट छायाचित्र ‘आ’ मधील देवतांची संख्या ही समष्टी साधनेच्या दृष्टीकोनातून केलेली आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१.२०२२)
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |