हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्षपणे खलनायक दाखवण्याचा प्रयत्न
भारतात लोकशाही असल्यामुळे कुणीही कुणावरही टीका करू शकतो; मात्र त्यात संयतपणा हवा. मोदीद्वेषापायी शाह यांच्यासारखे कथित निधर्मीवादी विवेक गमावून बसले आहेत, हेच यातून दिसून येते !
नवी देहली – चित्रपट अभिनेते नसिरूद्दीन शाह यांनी फेसबूकवर एक छायाचित्र पोस्ट करून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खलनायक आहेत’, असे अप्रत्यक्ष दाखवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी उत्तराखंडमधील प्रसिद्ध ब्रह्मकमल टोपी परिधान केली होती. शाह यांनी ब्रह्मकमल टोपी परिधान केलेले मोदी यांचे आणि तशाच प्रकारची टोपी घातलेले चित्रपट अभिनेते अमरिश पुरी यांचे छायाचित्र बाजूला पोस्ट केले आहे. या ‘पोस्ट’मधील अभिनेते अमरिश पुरी यांचे छायाचित्र ‘तहलका’ चित्रपटातील ‘जनरल डाँग’ या खलनायक असलेल्या पात्राचे आहे. यातून पंतप्रधान मोदी हे खलनायक असल्याचे अप्रत्यक्ष दाखवण्यचा प्रयत्न शाह यांनी केला आहे. (‘हिंदुत्वनिष्ठ आक्रमक प्रचार करतात’, ‘ते खालच्या थराला जाऊन टीका करतात’, असे म्हणणारे निधर्मीवादी आता गप्प का ? – संपादक)