सांगली जिल्ह्यातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा १ फेब्रुवारीपासून चालू होणार ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली
सांगली, ३१ जानेवारी (वार्ता.) – जिल्हास्तरीय परिस्थितीचा विचार करून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना पडताळणीचा ‘पॉझिटिव्हिटी’ दर स्थिर असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अल्प होतांना दिसत आहे. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ‘१ फेब्रुवारीपासून सांगली जिल्ह्यातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा चालू होणार’, असे सांगितले.