काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

वर्ष १९८४ ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी हे दलित शीख असल्याचा प्रचार करून काँग्रेसने साक्षात् गुरु गोविंदसिंह यांचा अपमान केला आहे. वर्ष २०१४ पर्यंत शीख आणि त्यांच्या गुरूंचा छळ करणार्‍या औरंगजेबाच्या नावाने देहलीत एक महामार्ग होता. काँग्रेसने ते नाव कधी पालटले नाही. काँग्रेसने एक प्रकारे शिखांचा अपमानच केला आहे.