सोलापूर रेल्वे स्थानकावरून विद्युत् इंजिनद्वारे रेल्वे धावण्यास प्रारंभ !
सोलापूर – सोलापूर रेल्वे स्थानकावरून म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर बसवा एक्सप्रेस, हसन-सोलापूर-हसन, सोलापूर-यशवंतपूर, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्या विद्युत् इंजिनद्वारे धावण्यास २८ आणि २९ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. यापूर्वी वाडी जंक्शन येथे डिझेल इंजिन काढून विद्युत् इंजिन जोडले जात होते; मात्र आता सोलापूर रेल्वे स्थानकावर इंजिन पालटले जात असल्याने प्रवाशांचा ३० मिनिटांचा कालावधी वाचणार आहे.