पुणे येथे इन्स्टाग्रामवर अश्लील आणि धमकी देणारे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी २ तरुणींना अटक !
पुणे – ‘थेरगाव क्वीन’ या‘ इन्स्टाग्राम प्रोफाइल’वर अश्लील, शिवीगाळ आणि धमकी देणारे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी १८ वर्षीय २ तरुणींसह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लेडी डॉन’ म्हणून वावरत होत्या. सदर तरुणींनी इंस्टाग्रामवर अनेकदा अश्लील शब्दांचा वापर करत व्हिडिओ ‘शेअर’ केले आहेत. (तरुणी ‘लेडी डॉन’ होणे, हे देशासाठी घातक आहे. मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीचा हा दुष्परिणाम आहे ! – संपादक)