मराठ्यांना संपवण्यासाठी टिपू सुलतानने इस्लामी राजवटींशी केलेला पत्रव्यवहार !

भारतियांनो, टिपू सुलतान हा देशाचा शत्रू आहे, हे कदापि विसरू नका ! – संपादक 

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मालवणी(मुंबई)  येथील एका क्रीडासंकुलाला देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे क्रीडासंकुल बांधण्यात आले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव क्रीडासंकुलाला दिल्यामुळे महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानच्या क्रौर्याचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

क्रूरकर्मा टिपू सुलतान

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते, ‘मुसलमान भारताला त्यांची मातृभूमी समजत नाहीत; कारण इस्लाम त्यांना तशी अनुमती देत नाही. ते भारतावर आक्रमण करण्यासाठी परकीय मुसलमान शक्तीला आमंत्रित करू शकतात.’ (साभार : महाराष्ट्र शासन प्रकाशित ‘समग्र वाड्मय’, खंड ८)

मराठ्यांना संपवण्यासाठी टिपू सुलतानने भारताबाहेरील इस्लामी राजवटींशी केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यापैकी त्याने अफगाणिस्तानचा नवाब झमानशाह याला वर्ष १७९७ मध्ये पाठवलेले पत्र उपलब्ध आहे. वर्ष १७६१ मध्ये नजीबखान रोहिल्याच्या विनंतीवरून भारतावर चालून आला होता, त्या अहमदशाह अब्दालीचा नातू म्हणजे झमानशाह हा होता. अब्दालीशी लढतांना पानिपतवर १ लाख मराठ्यांना बलीदान द्यावे लागले होते.

झमानशहाला पाठवलेल्या पत्रात टिपू सुलतान म्हणतो, ‘‘देहलीच्या गादीवर सध्या मराठ्यांचे वर्चस्व आहे. कित्येक वर्षांपासून इस्लामी राज्य असलेल्या देहलीच्या तख्तावर काफीर (अन्य धर्मीय) लोकांचे राज्य असतांना जगभरातील मुसलमान राजांचे हे पवित्र कर्तव्य आहे की, त्यांनी एकत्र येऊन मराठ्यांकडून देहली कह्यात घ्यावी. देहली कह्यात घेतल्यानंतर झमानशाहने दक्षिणेत उतरावे. दक्षिणेत मी स्वतः जिहादची योजना करत असून आपण एकत्र येत काफीर मराठ्यांचे पारिपत्य करू आणि इस्लामच्या तलवारीसमोर त्यांना गुडघे घासायला भाग पाडू.’’

महाराष्ट्र आणि मराठी जनता यांचे दुर्दैव म्हणजे या टिपू सुलतानाचे छायाचित्र छत्रपती शिवरायांच्या चित्राच्या शेजारी ठेवून त्याची जयंती आमचेच लोक साजरे करत आहेत !’

लेखक – श्री. गजानन भास्कर मेहेंदळे

(साभार – ‘टीपू ॲज ही रियॅलटी वॉज’, पान क्र. ७०)