पुणे येथील पोलिसाचा नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न !

असे मनोबल खचलेले पोलीस जनतेचे संरक्षण कसे करणार ? १४ ते १८ घंटे काम करणार्‍या पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जीवनात घडणार्‍या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धर्मशिक्षणच हवे ! – संपादक

शिक्रापूर पोलीस

नगर – पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी हरिभाऊ मांडगे यांनी नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात २९ जानेवारी या दिवशी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून ते पेटवण्याच्या प्रयत्नात असतांना तेथे उपस्थित असणारे पोलीस उपअधीक्षक अजित कातकाडे यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. मांडगे यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंद आहे. हा खोटा आरोप असून स्थानिक पोलीस त्रास देत असल्याचा आरोप करून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे.