अविनाश पाटील यांनी दाभोलकर कुटुंबियांवरील केलेले आरोप धादांत खोटे ! – अंनिस
अंनिसमधील अंतर्गत तीव्र वाद !
सातारा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व व्यवहार ‘ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाच्या वतीने केले जातात. अविनाश पाटील यांना त्यांची अकार्यक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवाया यांमुळे विश्वस्तपदावरून गेल्या वर्षीच काढले आहे. तसेच डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर या ट्रस्टी नाहीत. त्यामुळे पाटील यांचे आरोप धादांत खोटे आहेत, असे उत्तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती न्यासाचे सचिव दीपक गिरमे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. त्यामुळे अंनिसमधील अंतर्गत वाद अधिकच चिघळला आहे.
“हमीद-मुक्ता गटाने ७ कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला”; अंनिसच्या अध्यक्षपदावरून वाद, अविनाश पाटील यांचे गंभीर आरोपhttps://t.co/crIL0dbYED < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #ANIS #AvinashPatil #HamidDabholkar pic.twitter.com/DwaHVyrEgX
— LoksattaLive (@LoksattaLive) January 29, 2022
अंनिसचे अविनाश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी अंनिसचा ट्रस्ट कह्यात घेऊन ७ कोटी रुपये हडपल्याचा आरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता. तसेच दाभोलकर कुटुंबियांकडून घराणेशाहीने काम करणे, मनमानीपणा काम केले जाते, असे अनेक आरोप केले आहेत.
हमीद- मुक्ता दाभोलकर गट ‘महाअंनिस’ पासून स्वतंत्र कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा दावा – https://t.co/GPXoDZy7xT
— TheFocusIndia (@FocusIndianews) January 30, 2022
या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ट्रस्टच्या स्थापनेपासून आतापर्यंत प्रतापराव पवार अध्यक्ष आहेत. ट्रस्टमधील सर्व निर्णय चर्चेनंतर सहमतीने घेतले जातात. तसेच अविनाश पाटील यांना ‘विवेक जागर’ नावाचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केल्यानंतर अंनिसचे नाव वापरू नये, यासाठी त्यांना समज दिलेली आहे. त्यांचा आमच्याशी कोणताही कायदेशीर, आर्थिक संबंध नाही. अंनिसमध्ये कुणी कार्याध्यक्ष नाही. कार्याध्यक्ष आणि अन्य काही पदे रहित करण्यात आली आहेत. एकाही ट्रस्टीने आजपर्यंत एकदाही पैसा, मानधन किंवा प्रवास खर्च घेतलेला नाही. ट्रस्टचे कार्यालय दाभोलकर कुटुंबियांनी विनामूल्य वापरण्यास दिलेल्या जागेत चालते. ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणार्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सांगली येथे कार्यालय आहे. ही जागा सोडून ट्रस्टची कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे ट्रस्टच्या मालमत्ता कुणी कह्यात घेतल्या, हे अत्यंत खोडसाळ आणि असत्य आरोप आहेत.