कोझीकोड (केरळ) येथे महंमद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यावरून पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंद
कोझीकोड (केरळ) – मुसलमानांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इरिट्टीजवळील माणिककडवू येथील कुन्नोथ सेमिनरीचे पाद्री अँथोनी थरक्कडविल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. माणिककडवू येथील सेंट थॉमस चर्चमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी केलेल्या भाषणात पाद्री अँथोनी यांनी हलाल खाद्यपदार्थ आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी अवमान करणारे विधान केल्याचा आरोप आहे. थलासरी येथील आर्कडायोसीज या ख्रिस्त्यांच्या धार्मिक संस्थेने स्पष्ट केले आहे की, ते पाद्य्राने केलेल्या टीकेचे समर्थन करत नाही.
Kerala: Case against Catholic priest for ‘hate’ speech https://t.co/CnfcaW0tOV
— TOI Cities (@TOICitiesNews) January 28, 2022