पेण (जिल्हा रायगड) येथे अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार
|
७ जणांना अटक !
पेण (जिल्हा रायगड) – पेण तालुक्यातील वाशी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर १० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे. पलायन केलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार पीडित मुलीच्या २ मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. याची माहिती अन्य मित्रांना कळताच त्यांनीही पीडितेला धमकावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश आहे का ? याचाही शोध पोलीस घेत आहेत. २२ सप्टेंबर २०२१ या दिवशी ठाणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर तिच्या काही मित्रांनी वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
काही मासांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका अल्पवयीन मुलीवर ६ मासांत ४०० जणांनी अत्याचार केल्याचा क्रूर प्रकार उघडकीस आला होता. अशा प्रकारे राज्यातील बलात्काराच्या अमानुष घटनांची वारंवारता वाढत आहे.