यावल (जिल्हा जळगाव) येथील श्रीमती शकुंतला फिरके यांच्याकडून भारत विद्यालयाला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट !
जळगाव, ३० जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थिनी आणि सनातनच्या साधिका श्रीमती शकुंतला फिरके यांनी सनातन संस्थेचे ३८ ग्रंथ विद्यालय अन् महाविद्यालय यांना भेट दिले. या वेळी शिक्षण प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. पी.एच्. महाजन यांच्यासह संस्थेचे सचिव श्री. हर्षद महाजन, तसेच मुख्याध्यापिका सौ. तिलोत्तमा चौधरी आणि शिक्षक उपस्थित होते.
श्री. महाजन या वेळी म्हणाले, ‘‘श्रीमती फिरके यांचे खर्या अर्थाने सत्पात्रे दान झाले. शाळेच्या उत्कर्षासाठी असे किती माजी विद्यार्थी विचार करतात ? शाळेसाठी अन्य ग्रंथ घेण्याचाही आम्ही विचार करू.’’