रस्त्यावर थुंकणारे आणि कचरा फेकणारे यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिका १ सहस्र ‘क्लीन-अप मार्शल’ नियुक्त करणार !
मुंबई – रस्त्यावर थुंकणारे, कचरा फेकणारे आदींवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिका १ सहस्र ‘क्लीन-अप मार्शल’ नियुक्त करणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कंत्राटीपद्धतीने ४० ते ६० ‘क्लीन-अप मार्शल’ नेमले जाणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देतांना घनकचरा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, ‘मास्क’ न वापरणार्यांवर कारवाई करण्यासाठी सध्या शहरात ७५० ‘क्लीन-अप मार्शल’ कार्यरत आहेत. यापुढे या कारवाईचे स्वरूप अधिक कडक करण्यासाठी ‘क्लीन-अप मार्शल’ची संख्या वाढवण्यात येणार आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणार्या ४३ लाख ८१ सहस्र ५६२ नागरिकांकडून ८७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी जनतेला स्वच्छता, शिस्त न शिकवल्याचा आणि पर्यायाने नागरिकांच्या मनात राष्ट्राविषयी प्रेम निर्माण न केल्याचा हा परिणाम आहे ! – संपादक)