पोलीस विभागातील लेखनिकाकडून होणारा भ्रष्टाचार
पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्याने व्यक्त केलेली व्यथा !
‘पोलीस विभागामध्ये लेखनिक हे पद असतांनाही शेकडा ७५ टक्के काम त्याच्या हाताखाली दिलेले पोलीस कर्मचारीच करत असतात आणि अधिकारी वर्गही त्यांच्याच बाजूने असतो. त्यातील काही पदे पुढीलप्रमाणे आहेत.
२. लेखा विभाग
‘या विभागाकडे सरकारला स्वतःची रजा विकणे, कर्मचार्याचे स्थानांतर झाल्यावर किंवा तो सेवानिवृत्त झाल्यावर त्याच्या नावावर देय असणारी रक्कम देणे, कर्मचार्याने रुग्णालयाची दिलेली देयके संमत करणे, भविष्यनिर्वाह निधीतून मुलांच्या विवाहासाठी रक्कम संमत करणे, नवीन किंवा जुनी वास्तू घेण्यासाठी देयक सिद्ध करणे हे दायित्व असते. येथेही पैसे दिल्याविना वरील कामे होत नाहीत. पैसे दिले नाहीत, तर संबंधित कर्मचार्याच्या कामात अडथळा निर्माण करून त्याची पिळवणूक केली जाते. पोलीस वसाहतीमध्ये निवास मिळवतांना सदर लेखनिक आणि त्यांचा कर्मचारीवर्ग त्यांना मिळालेला भ्रष्टाचारी पैशांचा काही भाग अधिकार्यांना देतात. तसेच काही लेखनिक अधिकार्यांसाठी कामे करतात. त्यामुळे त्यांची तक्रार केली, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.’ – एक पोलीस कर्मचारी