खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
गारगोटी (जिल्हा कोल्हापूर), ३० जानेवारी (वार्ता.) – भाजप आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य असल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते रहित केले आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य केले असून त्यांच्याविरोधात अवमानकारक याचिका प्रविष्ट करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
आमदार निलंबनप्रकरणी अवमानकारक वक्तव्य #Sakal #Kolhapur #AnilParab #ChandrakantPatil #SanjayRaut #PoliticalNews https://t.co/ZJj21Z3n5e
— SakalMedia (@SakalMediaNews) January 30, 2022
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘गतवर्षी जुलैमध्ये तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला असून आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे. किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीला अनुमती देण्याच्या सरकारच्या निर्णयामागील नेमके कारण लवकरच उघड होईल. भविष्यात स्वस्त धान्य दुकानातही मद्यविक्री करण्याचा निर्णय घेऊन सरकार जनतेला देशोधडीला लावेल.’’