गुरुपौर्णिमा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना पुणे येथील वाचक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

श्री. आणि सौ. देगलूरकर (दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक), पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून ‘पती-पत्नीनेही एकमेकांकडे ‘साधक’ म्हणून पाहून स्वभावदोष निर्मूलन करून साधनेमध्ये एकमेकांना साहाय्य केले पाहिजे’, हे लक्षात येणे

५.७.२०२० या दिवशी आम्हाला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा सोहळा पहाता आला, हीसुद्धा श्री गुरूंचीच कृपा आहे. (पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले होते. त्याची ध्वनीचित्र-चकती या सोहळ्यात दाखवण्यात आली.) ध्वनीचित्र-चकतीत प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांशी बोलत असतांना ‘माझ्याच मनातील शंकांची उत्तरे मिळत आहेत’, याचा आम्हाला अनुभव येत होता. त्यांच्या मार्गदर्शनातून ‘पती-पत्नीनेही एकमेकांकडे साधक म्हणून पाहून स्वभावदोष निर्मूलन करून एकमेकांना साधनेमध्ये साहाय्य केले पाहिजे’, हे आमच्या लक्षात आले. मला त्यांच्या मार्गदर्शनातील हा भाग सर्वांत अधिक आवडला. संपूर्ण कार्यक्रम पहातांना आम्हाला आनंद अनुभवायला मिळाला.’


कुमार युवराज गायकवाड (धर्मप्रेमी), सासवड, पुणे.

१. प.पू. गुरुदेवांच्या आवाजात अतिशय मधुरता असून त्यांचे मार्गदर्शन ऐकतांना मन निर्विचार होणे आणि गुरुदेवांच्या वाणीतील चैतन्यामुळे शरीर संपूर्णपणे हलके झाल्याचे जाणवणे

‘५.७.२०२० या दिवशी मला सनातन संस्थेच्या वतीने झालेला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा कार्यक्रम पहाण्याची संधी मिळाली. ‘गुरुपूजनाचा कार्यक्रम चालू असतांना तो पहातच रहावा’, असे मला वाटत होते. कार्यक्रमामध्ये पुष्कळ सात्त्विकता जाणवत होती. गुरुपूजन करणार्‍या ताईंकडे (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे) पाहून ‘सगळीकडे पुष्कळ सात्त्विकता निर्माण झाली आहे’, असे वाटत होते. त्यानंतर प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मार्गदर्शन असणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. तेव्हा ‘मार्गदर्शन ऐकतच रहावे. ते थांबूच नये’, असे मला वाटत होते. त्यांच्या आवाजात अतिशय मधुरता होती. प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकतांना मन निर्विचार झाले होते आणि गुरूंच्या वाणीतील चैतन्यामुळे शरीर संपूर्णपणे हलके झाल्याचे जाणवत होते.

२. स्वभावदोष आणि अहं अल्प करण्यासाठी गुरूंनी सांगितलेली प्रक्रिया मनापासून करण्याचा निर्धार होणे

‘गुरूंच्या मार्गदर्शनामुळे साधना करतांना स्वतःचे स्वभावदोष आणि अहं नष्ट केल्याविना आपण करत असलेली साधना योग्य प्रकारे होणार नाही’, याची मला जाणीव झाली. तेव्हा स्वभावदोष आणि अहं अल्प करण्यासाठी गुरूंनी मार्गदर्शनात जी प्रक्रिया सांगितली आहे, ती मनापासून करण्याचा माझ्या मनाचा निर्धार झाला.

३. शेवटी सद्गुरु जाधवकाकांचे मार्गदर्शन ऐकतांना ‘पुढे येणार्‍या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपण साधना करून सिद्ध व्हायला हवे’, हे लक्षात आले.

एकंदरीत संपूर्ण गुरुपौर्णिमा कार्यक्रम पाहिल्यावर मला अत्यंत आनंद जाणवला. मी पहिल्यांदा असा कार्यक्रम पाहिला. यापुढील अशा सर्व विविध कार्यक्रमांमध्ये मी सहभागी होईन. श्रीकृष्णाने हा कार्यक्रम पहाण्याची संधी दिली, त्याबद्दल त्याच्या चरणी कृतज्ञता !’ (२१.७.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक