सेमी इंग्रजी माध्यम नको म्हणून सातारा येथे विद्यार्थिनीची आत्महत्या !
मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! – संपादक
सातारा, ३० जानेवारी (वार्ता.) – येथील नववीमध्ये शिकणार्या एका विद्यार्थिनीने सेमी इंग्रजी माध्यम नको; म्हणून रहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून ही गोष्ट समोर आली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सीमेत ही घटना घडली आहे. चिठ्ठीत लिहिले होते की, माझ्या मृत्यूला कुणालाही उत्तरदायी धरू नका. मला सेमी इंग्रजी माध्यम नको असल्याने मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.