पाटण (गुजरात) येथे विवाहित महिलेने विवाह करण्यास नकार दिल्यावर धर्मांधाकडून तिच्यावर आक्रमण
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंदु महिलेवर आक्रमण करण्याचे धाडस होणे अपेक्षित नाही, असे हिंदूंना वाटते ! – संपादक
पाटण (गुजरात) – येथे यासीन मजीखान बलूच नावाच्या तरुणाने एका विवाहित हिंदु महिलेवर तिने विवाह करण्यास नकार दिल्याने तिच्यावर आक्रमण केले. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ‘या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून कुणालाही सोडणार नाही’, असे म्हटले आहे. ही महिला घरात एकटी असतांना यासीन तिच्या घरात घुसला आणि विवाह करण्याचा दबाव निर्माण करू लागला. महिलेने नकार दिल्यावर त्याने तिला ठार मारण्याची धमकी दिली. हे दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून ओळखत आहेत. यापूर्वी यासीन याने या महिलेच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी दिली होती.
Gujarat: Communal tension prevails in Radhanpur after Hindu woman attacked by a Muslim man in her own home https://t.co/jZkxmPUFu6
— OpIndia.com (@OpIndia_com) January 30, 2022