मी आधी मुसलमान आणि नंतर भारतीय ! – समाजवादी पक्षाचे माजी आमदार माविया अली
वर्ष २०१७ मधील विधान असलेला व्हिडिओ भाजपकडून प्रसारित
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘मी आधी मुसलमान आणि त्यानंतर भारतीय आहे. आमच्यावर कुणी जोर-जबरदस्ती करू शकत नाही’, असे विधान उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे माजी आमदार माविया अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ भाजपकडून सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ वर्ष २०१७ चा असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर सरकारने ‘स्वातंत्र्यदिनाला सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणावे आणि त्याचा व्हिडिओ काढावा’, असा आदेश काढला होता. त्यावर माविया अली यांनी वरील विधान केले होते, असे सांगितले जात आहे.
‘मैं पहले मुसलमान फिर भारतीय…’ कौन हैं सपा में घमासान मचाने वाले देवबंद के माविया अली
पढ़ें: https://t.co/befrHK21ma @NavbharatTimes @BJP4UP #UPElection2022 pic.twitter.com/b0ddNGctbr— NBT Uttar Pradesh (@UPNBT) January 29, 2022