मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाची प्राथमिक संमती
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखड्याला प्राथमिक संमती दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये २२७ ऐवजी २३६ प्रभाग असणार आहेत. या प्रारूप आराखड्याच्या संदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी निवडणूक आयोगाने महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवले आहे. हा आराखडा ओ.बी.सी. आरक्षण वगळून सूचना हरकतीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता आणि निवडणूक प्रभागाच्या सीमा घोषित करून हरकती अन् सूचना मागवणे आणि त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीतपर्यंत घोषित केला आहे.