राज्यघटनेतील अकबर आणि टिपू सुलतान यांची चित्रे हटवा !

अजयसिंह सेंगर यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली मागणी !

  • अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना का करावी लागते ? शासनकर्त्यांना ते लक्षात कसे येत नाही ? – संपादक

  • राज्यघटनेतील ही घोडचूक गेल्या ७२ वर्षांमध्ये कुणालाच कशी लक्षात आली नाही ? सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! – संपादक 
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन देतांना अजय सिंह सेंगर

मुंबई – हिंदूंवर अत्याचार करणारा टिपू सुलतान आणि अकबर यांची चित्रे ‘देश की महान विरासत’ असे नमूद करत राज्यघटनेत देण्यात आली आहेत. ही चित्रे राज्यघटनेतून काढून टाकण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. याविषयी २८ जानेवारी या दिवशी श्री. सेंगर यांनी राज्यपालांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन दिले. या वेळी संत रोहिदास सेनेचे अध्यक्ष श्री. किरण सोनवणे आणि शेरा राजपुरोहित हेही उपस्थित होते.

या निवेदनामध्ये श्री. अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे की, हिंदूंवर अत्याचार करणारा, सहस्रावधी हिंदूंची हत्या करणारा आणि हिंदूंची मंदिरे तोडणारा अकबर अन् टिपू सुलतान हे ‘महापुरुष’ कसे ? केवळ मुसलमानांच्या मतांसाठी काँग्रेसने राज्यघटनेत ही चित्रे छापली आहेत. हिंदूंना डिवचण्याकरता अकबर आणि टिपू सुलतान यांना हा सन्मान देण्यात आला आहे.