नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन करावे लागते, हे भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूला ७७ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र जपानमधील त्यांच्या अस्थी भारतात आणणे शक्य झालेले नाही. नेताजी बोस यांची मुलगी म्हणून मला नेताजींच्या अस्थी भारतात आलेल्या पहायच्या आहेत. माझ्या वडिलांनी आपल्या देशावर जिवापाड प्रेम केले. देशाला स्वातंत्र्य मिळालेले पहाण्याचे त्यांचे स्वप्न होते; मात्र त्यांना ते पहाता आले नाही. तथापि त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांच्या अस्थी त्यांच्या प्राणप्रिय देशात पोचल्या पाहिजेत’, अशा भावना नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकुलती एक मुलगी अनिता बोस यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली.’