सनातनचे कार्य प्रत्येक जिज्ञासूच्या उद्धारासाठी असणे !
‘भगवान त्याच्या केवळ एका भक्तासाठीही अवतार घेतो. याच तत्त्वाने सनातनचे कार्य चालू आहे, उदा. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला एखाद्या ठिकाणी चांगला प्रतिसाद नसला, तरी त्या भागातील एका जिज्ञासूसाठी तेथे कार्य केले जाते. त्या एका जिज्ञासूची आध्यात्मिक प्रगती होणे महत्त्वाचे आहे. एखादा ग्रंथ प्रकाशित केल्यावर त्याची खूप विक्री झाली नाही, तरी चालेल; पण ‘ज्या जिज्ञासूला तो आवश्यक आहे, त्याला तो ग्रंथ मिळाला पाहिजे’, या उद्देशाने तो छापला जातो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०२२)