सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगात जोडलेल्या जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती
सौ. विजया ठाणेकर, रामटेक, नागपूर.
१. ‘मी सत्संगाशी कशी जोडले गेले ?’, हे माझ्या लक्षातच आले नाही. मी सत्संग एकाग्रतेने ऐकते. मला सत्संग ऐकण्याची ओढ वाटते.
२. सत्संगात मला पुष्कळ शांत वाटून आनंद मिळतो. ‘सत्संगातील विषय संपूच नये’, असे मला वाटते. यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
श्रीमती शालिनी देशपांडे, नागपूर
१. ‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन झाले.
२. २६.२.२०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू असतांना मला हार घातलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून ३ वेळा दर्शन झाले. मला ते क्षण अतिशय सुखद वाटत होते.’ (१.६.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |