पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्याने व्यक्त केलेली व्यथा !
|
‘पोलीस विभागामध्ये काम केले नाही, तरी चालेल; परंतु अधिकार्यांपुढे हुजरेगिरी करणे आवश्यक असते. या विभागामध्ये लाच घेणारे, व्यसनाधीन, पत्ते खेळणारे, जुगार खेळणारे, कर्जबाजारी, मुलांचे शिक्षण अर्धवट असणारे, मुलाला नोकरी नसणारे अशा कर्मचार्यांचा एक गट असतो. पोलीस अधिकार्यांच्या निवासस्थानीच पोलीस विभागातील बराचसा कर्मचारी वर्ग काम करण्यासाठी वापरला जातो. हा वर्ग या अधिकार्यांच्या नावावर त्यांना नेमून दिलेले काम करण्यास टाळाटाळ करत असतो. त्यामुळे निष्ठेने काम करणार्या पोलीस कर्मचार्यांना अधिक प्रमाणात काम करावे लागते. त्याचा त्यांना ताणही सहन करावा लागतो.’
– एक पोलीस कर्मचारी