७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा कह्यात, ७ आरोपी अटकेत
मुंबई – भारतीय चलनाच्या ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा वितरीत करण्यासाठी आलेल्या ७ जणांच्या टोळीला २६ जानेवारी या दिवशी पोलिसांनी दहिसर येथून अटक केली आहे. मुंबईत बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दहिसरमध्ये सापळा रचून संशयित गाडीतून २ सहस्र रुपयांच्या ५ कोटी रुपयांच्या नोटा कह्यात घेतल्या. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर अंधेरी (पश्चिम) येथील एका उपाहारगृहावर छापा टाकून ३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २ कोटी रुपयांच्या बनावट नोटा कह्यात घेण्यात आल्या. अटक केलेल्या आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.