एअर इंडियाचे अधिकृत नियंत्रण टाटा आस्थापनाकडे !
नवी देहली – ‘टाटा सन्स’ आस्थापनाने २७ जानेवारी या दिवशी अधिकृतपणे एअर इंडिया आस्थापनेचे नियंत्रण घेतले आहे. टाटाने सरकारकडून या आस्थापनाचे १०० टक्के शेअर १८ सहस्र कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. या आस्थापनावर २३ सहस्र कोटी रुपयांचे कर्जही आहे. या आस्थापनामुळे आता टाटा देशातील दुसरी सर्वांत मोठे विमान आस्थापन बनले आहे. ६९ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटाकडे आली आहे. पूर्वी एअर इंडियाची मालकी टाटाकडेच होती. नंतर त्याचे सरकारीकरण करण्यात आले होते. एअर इंडियाचे नियंत्रण मिळाल्यावर प्रारंभी काही उड्डाणांमध्ये चांगल्या प्रतीचे भोजन देण्याला प्रारंभ करण्यात येणार आहे.
Excited to take off with you! 😊 #AirIndiaOnBoard https://t.co/t1HEGKTwlE
— Tata Group (@TataCompanies) January 27, 2022