भाषा म्हणून हिंदीला आमचा मुळीच विरोध नाही; पण ती लादण्याला आमचा विरोध ! – तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – भाषा म्हणून हिंदीला आमचा मुळीच विरोध नाही; पण ती लादण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत, त्याला आम्ही कठोर विरोध करत आहोत. हिंदीची सक्ती करणे, हिंदी भाषा लादण्याला आमचा विरोध आहे. आम्हाला तमिळ भाषेविषयी प्रेम आहे; पण त्याचा अर्थ आम्ही इतर भाषांचा द्वेष करतो, असे नाही, असे प्रतिपादन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी भाषेच्या संदर्भातील संघर्षासाठी प्राण गमावलेल्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.


स्टॅलिन पुढे म्हणाले की, मातृभाषा बोलणारे संकुचित विचारसरणीचे असतात, हा चुकीचा समज आहे. आम्ही तमिळ बोलत असल्याने संकुचित विचारसरणीचे आहोत, असा त्याचा अर्थ होत नाहीत. केवळ हिंदीच नाही, तर आम्ही कोणत्याही भाषेविरोधात नाही. याचप्रमाणे एखादी भाषा शिकणे हा प्रत्येक व्यक्तीचा ऐच्छिक विषय असायला हवा. ती भाषा शिकण्यासाठी त्याच्यावर दबाव आणता कामा नये. ज्यांना हिंदीची सक्ती करायची आहे त्यांना ‘भाषा’ हे अधिकार गाजवण्याचे माध्यम वाटते. ज्याप्रमाणे त्यांना केवळ एकच धर्म असावा, असे वाटते, तसेच त्यांना केवळ एकच भाषा असावी. असे वाटते.