‘धृपद’ आणि ‘ख्याल’ या गायनप्रकारांचा सराव करतांना अन् अन्य कलाकारांनी गायलेले तेच गायनप्रकार ऐकतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी केलेला तुलनात्मक अभ्यास

‘काही दिवसांपूर्वी मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सराव करत असतांना ‘ख्याल’ (टीप १) गायनासह ‘धृपद’ (टीप २) या शास्त्रीय गायनाचाही सराव केला. ख्यालगायनापेक्षा धृपदगायनाच्या सरावाच्या वेळी मला दैवी शक्ती जाणवली. काही मान्यवर कलाकारांचे धृपदगायन ऐकतांनाही मला तीच अनुभूती आली. ‘धृपद’ हा प्राचीन काळापासून चालत आलेला गायनप्रकार आहे. सध्या धृपदगायन मागे पडून ख्यालगायन अधिक प्रचलित असल्याचे दिसून येते.

टीप १ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत म्हणजे ख्याल.

टीप २ – प्राचीन काळातील अत्यंत लोकप्रिय गायनशैली म्हणजे धृपद. धृपदाचे काव्य हे वीररस, शांतरस, तसेच भक्तीरस यांनी युक्त असते, तसेच हा प्रकार भारदस्त आणि जोरकस असतो.

सौ. अनघा जोशी

ख्यालगायन आणि धृपदगायन यांचा आणखी अभ्यास होण्याच्या दृष्टीने माझ्यासह संगीताचा अभ्यास करणार्‍या अन्य दोन साधिकांनीही (सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी आणि कु. रेणुका कुलकर्णी यांनीही) ख्यालगायन आणि धृपदगायन ऐकले. आम्ही संगीताचा सराव करतांना धृपद आणि ख्याल या गायनप्रकारांचा अभ्यास केला. त्या वेळी आम्हाला आलेल्या अनुभूती आणि आमच्याकडून झालेला तौलनिक अभ्यास पुढे दिला आहे.

दुर्दैवाने दैवी शक्तीने युक्त असलेले धृपदगायन लोप पावत चालले आहे. ‘हे दैवी गायन पुनश्च प्रचलित होवो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

– सौ. अनघा शशांक जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१.२०२२)


१. ख्यालगायन आणि धृपदगायन यांचा सराव करतांना केलेला तुलनात्मक अभ्यास

टीप ३ – परकीय आक्रमणांमुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्यालगायनात शृंगारिकता, तसेच मनोरंजकता अधिक आली. त्यामुळे ख्यालगायनात देवतांच्या बंदिशींच्या (टीप ४) व्यतिरिक्त शृंगारिक बंदिशीही असतात. धृपदगायनात केवळ देवतांच्याच बंदिशी असतात.

टीप ४ – बंदिशी म्हणजे शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. ही मध्यलय किंवा द्रुतलयीत गातात.

२. अन्य कलाकारांचे ख्यालगायन आणि धृपदगायन ऐकतांना केलेला तुलनात्मक अभ्यास

टीप ५ – ख्यालगायनाला तबल्याची साथ असते (काही जण पखवाज वापरतात), तर धृपदगायनाला पखवाजाची साथ असते.’

– सौ. अनघा शशांक जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१.२०२२)

३. अन्य कलाकारांचे ख्यालगायन आणि धृपदगायन ऐकतांना केलेला तुलनात्मक अभ्यास

सौ. भक्ती कुलकर्णी

टीप ६ – रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार म्हणजेच ‘आलाप’ होय. स्वरांचा उच्चार केवळ ‘आऽऽऽ’कारात करणे, म्हणजे ‘आलाप’ होय.

– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी, संगीत अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१.२०२२)

४. अन्य कलाकारांचे धृपदगायन ऐकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

कु. रेणुका कुलकर्णी

अ. ‘या गायनातून भावजागृती सहज होऊन उच्च आध्यात्मिक पातळी असणार्‍यांना हे गायन योग्य प्रकारे समजू शकते आणि त्यांना उच्च अनुभूतीही येऊ शकतात’, असे मला जाणवले.

आ. मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या. त्या वेळी ‘माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी वायुतत्त्व आदळत आहे आणि मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला भीती वाटत आहे’, असे मला जाणवले.

(‘संगीतातील चैतन्यामुळे साधिकेला आध्यात्मिक लाभ होऊन तिला जे तत्त्व आवश्यक आहे, ते मिळाले आणि तिला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला त्रास झाला.’ – संकलक)

इ. त्यानंतर ‘माझ्या शरिरातील त्रासदायक (काळी) शक्ती माझे अनाहतचक्र, आज्ञाचक्र आणि नंतर सहस्रारचक्र यांमधून बाहेर पडली’, असे मला जाणवले.

ई. धृपदगायन ऐकल्यानंतर पुढील २ घंटे धृपदाचे स्वर माझ्या मनात घोळत होते.

उ. धृपदगायन ऐकतांना ‘त्यातील विलंबित (संथ) लय आणि मिंड (टीप ७) यांमुळे त्यात अधिक चैतन्य आहे’, असे मला जाणवले. धृपदातील विलंबित लयीतील गायन ऐकून ‘ॐ’कार ऐकत आहे’, असे मला जाणवले.’

टीप ७ – एका स्वरावरून दुसर्‍या स्वरावर घसरत जाणे’

– कु. रेणुका कुलकर्णी, संगीत अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.