नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल’ पुरस्काराने सन्मानित !
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील ६ बालकांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पदक, १ लाख रुपये आणि प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील ६ बालकांमध्ये येथील कु. श्रीनभ अग्रवाल याचाही समावेश आहे. क्रीडा, शौर्य आणि नवसंशोधन यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. श्रीनभ याने झाडावर येणारा ‘यलो मोझॅक’ विषाणू नष्ट करण्यासाठी एक नैसर्गिक सोल्युशन बनवले. त्यासाठी त्याला नवसंशोधनाचा पुरस्कार दिला आहे. श्रीनभ लहानपणापासूनच मेहनती असून तो प्रतिदिन १८ घंटे कामाचे नियोजन करतो.
पंतप्रधानांनी सन्मानित केल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. देशासाठी नोबल मिळवण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया श्रीनभ याने दिली.