गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील महंमद अली जीना टॉवरवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणारे हिंदु वाहिनी संघटनेचे ३ कार्यकर्ते अटकेत !
महंमद अली जीना टॉवरचे नाव पालण्यात आले नाही, तर उद्ध्वस्त करू ! – भाजप आणि हिंदु संघटना यांची चेतावणी
महंमद अली जीना यांच्या नावाने टॉवर असणारे गुंटूर भारतात आहे कि पाकिस्तानात ? स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत हे नाव कायम ठेवणार्या शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! – संपादक
गुंटूर (आंधप्रदेश) – येथील कोथापेट भागामध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी हिंदु वाहिनी संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची घटना प्रजासत्ताकदिनी घडली. फेरी काढून राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणार्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Andhra Pradesh: Hindu Vahini members manhandled, detained by Guntur Police for trying to hoist the Tricolour at ‘Jinnah Circle’https://t.co/V7mEIya4Zh
— OpIndia.com (@OpIndia_com) January 27, 2022
गेल्या काही काळापासून भाजप आणि हिंदु संघटना या टॉवरचे नाव पालटण्याची मागणी करत आहेत. ‘जर सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नाही, तर हे टॉवर उद्ध्वस्त केले जाईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिलेली आहे. भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी यापूर्वीच या टॉवरचे नाव पालटून शास्त्रज्ञ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी केली होती.