रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ऋषीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. पुरोहित साधक ऋषींना आवाहन करत असतांना भाव जागृत होणे
‘९.१.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या ऋषीयागाच्या वेळी पुरोहित साधक श्री. दामोदर वझे हे ऋषींना आवाहन करत असतांना माझी भावजागृती होत होती. त्या वेळी सप्तर्षी आल्याचे ऋषींच्या आकृतीरूपातून जाणवले.
२. कश्यपऋषींना आहुती देत असतांना त्यांचे दर्शन होणे आणि त्यांना प्रार्थना होणे
ऋषीयागामध्ये कश्यपऋषींसाठी यज्ञामध्ये आहुती देण्यात येत होती. त्या वेळी मला कश्यपऋषींचे दर्शन झाले. त्यांना पहाताच माझ्याकडून मनोमन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आणि साधकांना होत असलेला अनिष्ट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना झाली.
३. यज्ञ चालू असतांना मधे मधे चंदनाचा सुगंध येत होता. हा सुगंध पूर्णाहुतीनंतरही येत होता.
४. यज्ञाच्या वेळी प्रारंभी श्रीरामाचा नामजप १ मिनिट झाला. त्यानंतर ५ मिनिटे श्रीकृष्णाचा नामजप होऊन केवळ ‘ॐ’काराचा उच्चार होत होता. नंतर माझ्याकडून दीर्घ श्वास घेतला जाऊन हळूहळू तो संथ होत गेला.’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |