नितेश राणेंचा अंतरिम अटकपुर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला !

  • संतोष परब हल्ला प्रकरण

  • शरणागती पत्करण्यासाठी १० दिवसांची मुदत

नवी देहली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

त्यांचा अंतरिम अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांनी दहा दिवसात जिल्हा न्यायालयाला शरण जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.