पुणे येथील हवेची गुणवत्ता ढासळली !
पुणे – येथील हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीतून अत्यंत खराब श्रेणीत पोचली आहे. शहरातील अनेक ठिकाणी अतीसूक्ष्म धूलीकण (पी.एम्. २.५) आणि सूक्ष्म धूलीकण यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २४ जानेवारी या दिवशी हवेची गुणवत्ता ३७४ प्रतिघनमीटर इतकी नोंदवली गेली. पुढील दोन दिवस हवेची गुणवत्ता खराब श्रेणीतच रहाणार आहे, असे उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आय.आय.टी.एम.) ‘सफर’ या संकेतस्थळावरील नोंदीतून स्पष्ट झाले आहे.
पुणे आणि मुंबईची हवा ही दिल्ली आणि अहमदाबाद या दोन्ही शहरांपेक्षा खराब असल्याचे नोंदण्यात आले.#Pune #DustStorm #SakalNews https://t.co/eeh6JHfhXY
— SakalMedia (@SakalMediaNews) January 24, 2022
आखाती देशातून पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, तसेच अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रात पोचले. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्र येथे दिवसभर धुके पसरले. अनेक ठिकाणी या कणांमुळे दृश्यमानता अल्प झाली होती. ‘या हवामानामुळे श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे’, असा सल्ला तज्ञांनी दिला.