पुणे पोलिसांना धक्काबुक्की करून आरोपी पळाला !
हे पोलिसांना लज्जास्पद नव्हे का ? असे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक
पुणे – मारहाण आणि शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणामध्ये पसार असलेल्या संपत शिवले या आरोपीला येथील तुळापूर परिसरात २३ जानेवारी या दिवशी दुपारी पकडण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्काबुक्की करून आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटून पळाला. त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांनी तक्रार दिली आहे.