सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती
सनातनच्या ११३ व्या संत पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या (वय ८९ वर्षे) संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती
‘१७.११.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांच्या अपार कृपेमुळे मला पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित (वय ८९ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. मला जे अनुभवता आले, ते मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.
१. ‘पू. विजया नीलकंठ दीक्षितआजींकडे पाहून मला पुष्कळ आनंद जाणवत होता आणि मला शांत वाटले.
२. पू. आजींचे नातेवाईक पू. आजींविषयी सांगत असतांना ‘त्या साक्षीभावाने ऐकत आहेत’, असे मला वाटले.
३. पू. आजी परात्पर गुरुदेवांप्रती सुचलेल्या भावपंक्ती गात असतांना त्यांच्या वाणीतील चैतन्य आणि भाव यांमुळे भावविश्व अनुभवता येणे
पू. आजी त्यांना परात्पर गुरुदेवांप्रती सुचलेल्या भावपंक्ती गात होत्या. तेव्हा मला त्यांच्या प्रत्येक पंक्तीत भाव जाणवला. त्या वेळी ‘मी आणि परात्पर गुरुदेव’ एवढेच विश्व होते. पू. आजी गात असतांना त्यांच्या वाणीतील ‘चैतन्य आणि भाव’ यांमुळे मला भावविश्व अनुभवता आले. ‘मी काही वेळ वेगळ्याच विश्वात होतो’, असे मला प्रथमच अनुभवता आले.
त्यानंतर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी सूक्ष्म परीक्षण करून सांगितले, ‘‘पू. आजी शिवदशेत असतात.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘पू. आजी शिवदशेत असल्याने देवाने मला वरील अनुभूती दिली.’
४. पू. आजी त्यांचा साधनाप्रवास सांगत असतांना ‘त्यांचे ध्यान लागत आहे’, असे वाटणे
पू. आजी त्यांचा साधनाप्रवास सांगतांना मधेच थांबायच्या. त्या वेळी ‘त्यांना काही आठवत नाही; म्हणून थांबायच्या’, असे नसून ‘त्यांचे ध्यान लागायचे किंवा त्या साक्षीभावात असायच्या’, असे मला वाटले.’
श्री. हरिश पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८. ११. २०२१)
|