आपण खरोखरीच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ?
आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताकदिन ! या निमित्ताने आपण काही मूलभूत गोष्टींचा मागोवा घेतला पाहिजे, जेणेकरून आपण खरोखरच प्रजासत्ताक भारतात रहात आहोत का ? या प्रश्नाचे उत्तर मिळेल. प्रजासत्ताक व्यवस्था साध्य होण्यासाठी येथे दिलेल्या या गोष्टी अत्यंत ढोबळ आहेत, अजून पुष्कळ गोष्टींचा येथे ऊहापोह करता येणे शक्य आहे; मात्र जोपर्यंत नागरिकांना रहात्या प्रदेशात निर्भयता आणि सुरक्षा नाही, तेथे अन्य गोष्टी गौण आहेत. भारतात ८० टक्के प्रजा ही हिंदु आहे. या हिंदु प्रजेची येथे सत्ता आहे का ? सध्या देशाच्या विविध भागांत हिंदूंवर होणारे अन्याय पाहिले तर आपण खरोखरच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ? असा प्रश्न उपस्थित रहातो.
संकलक – श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. राज्यघटनेचा स्वीकार म्हणून प्रजासत्ताकदिन !
भारताने २६ जानेवारी १९५० ला राज्यघटनेचा पूर्णपणे स्वीकार केला. ‘२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने स्वतंत्र भारताची राज्यघटना तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे नेली. त्यानंतर २ मासांनी, म्हणजे २६ जानेवारी १९५० या दिवशी ती पूर्णपणे स्वीकारली गेली, म्हणजेच कार्यवाहीत आणली गेली; म्हणूनच आपण हा दिवस ‘प्रजासत्ताकदिन’ या नावाने साजरा करतो.
२. आतंकवादाचे सावट या वर्षीही !
प्रतिवर्षी १५ ऑगस्ट आणि प्रजासताकदिनाप्रमाणे असलेले आतंकवादी आक्रमणाचे सावट या वर्षीही प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमावर आहे. उत्तर भारतात काही स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत, तसेच आतंकवाद्यांनी घातपात करण्याचा कट रचल्याचे त्यांच्याकडून उघड झाले आहे. पकडल्या गेलेल्या आतंकवाद्यांकडून ही माहिती मिळाली. भारताच्या सैन्यदलप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्यानुसार सीमेवरील आतंकवाद्यांच्या ‘लॉन्च पॅड’वर (आतंकवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्यासाठी जेथे एकत्र येतात, ती जागा) ३०० ते ४०० आतंकवादी भारतात घुसण्याची सिद्धता करत आहेत. काश्मीरमध्ये सध्याही चालू असलेल्या आतंकवादी आणि भारतीय सैन्य यांच्यातील चकमकी यांतून आतंकवादाचे सावट एवढ्या वर्षांतही दूर झालेले नाही, याची निश्चिती होते.
३. हिंदूंना राज्यघटनेनुसार धर्मपालनाचे स्वातंत्र्य नाही !
अगदी काही दिवसांपूर्वी तमिळनाडूतील एका कॉन्व्हेंट शाळेतील (ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवल्या जाणार्या शाळा) हिंदु मुलीवर ख्रिस्ती पंथात धर्मांतरित होण्यास बळजोरी केल्याने तिने आत्महत्या केली. राज्यघटनेनुसार प्रत्येकाला स्वत:च्या धर्मपालनाचे स्वातंत्र्य आहे; मात्र हिंदूंसाठी ते नाही असे का ? हिंदु मुलांना ख्रिस्त्यांच्या शाळांमध्ये हिंदु परंपरेनुसार टिळा लावणे, मुलींनी टिकली लावणे, बांगड्या घालणे यांना मज्जाव केला जातो. हा राज्यघटनेचा अवमानच आहे; मात्र त्याविषयी कुणी काही बोलत नाही.
४. हिंदूंना निर्भयतेने रहाण्याच्या मूलभूत अधिकारावर बंधने !
देहली, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे अन् त्रास देण्यामुळे हिंदूंना घर, संपत्ती सोडून पलायन करावे लागत आहे. बहुसंख्य आणि अल्पसंख्य यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची हमी राज्यघटना देत असतांना बहुसंख्यांकांना अल्पसंख्यांकांच्या दहशतीमुळे पलायन करावे लागणे, ही लोकशाही आहे का ? असा प्रश्न बहुसंख्य हिंदूंच्या मनात आला, तर ते साहजिक आहे. जगात असे एका तरी देशात होते का ? पाक आणि बांगलादेश येथे तर बहुसंख्य मुसलमानांकडून अल्पसंख्य हिंदूंना प्रतिदिन मार खावा लागतो, त्यांच्या हत्या होतात. भारतात उलटेच आहे. धर्मनिरपेक्ष असूनही राज्यघटना हिंदूंना संरक्षण का देऊ शकत नाही ? हिंदूंना सन्मानाने आणि शांतपणे जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जात आहे. असे प्रजासत्ताक काय कामाचे ? असे हिंदूंना वाटले, तर चूक ते काय ?
५. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण न होणे !
तमिळनाडू येथे आतापर्यंत रस्ता रुंदीकरण, अन्य बांधकामे यांच्या नावाखाली हिंदूंची शेकडो मंदिरे पाडण्यात आली आहेत. बहुसंख्य हिंदूंचीच मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्यात येत आहेत, अन्य धर्मियांच्या संदर्भात मात्र तसे आढळले नाही. राज्यघटना हिंदु धर्मियांना जगण्याचे, त्यांच्या धर्मपालनाच्या मूलभूत अधिकाराचे, त्यांच्या संपत्तीच्या रक्षणाचे, त्यांच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणाचे असे कोणतेही दायित्व घेण्यास असमर्थ ठरली आहे, असे येथे लक्षात येते.
६. हिंदूंना काश्मीरमध्ये परतण्यासारखी परिस्थिती नाही !
३७० कलम रहित केले तरीही काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये परतण्यासारखी परिस्थिती नाही. तेथे अजूनही सुरक्षादले आणि आतंकवादी यांच्यात चकमकी चालूच आहेत, तसेच तेथे आतंकवादी व्यक्ती हिंदु असल्याची ओळख पटवून हिंदूंच्या हत्या करत आहेत. हिंदू अशा भीतीच्या वातावरणात कसे जगू शकणार ?
७. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उपमर्द अद्यापही चालूच !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अतुलनीय योगदान आहे. त्यांनी देशासाठी सर्वाेच्च त्याग केला आहे. असे असूनही स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या पदरी उपेक्षाच आली आहे. वाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये, जे.एन्.यू.सारख्या विद्यापिठामध्ये त्यांचा अवमान करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही टीकाटीप्पणी खपवली जात असल्याने संबंधितांना कठोर शिक्षा होत नाही. परिणामी त्यांचा उपमर्द चालूच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वाेच्च नागरी सन्मान देण्यासाठी वेळकाढूपणा का केला जात आहे ? हे जनतेला समजत नाही.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.