भारतवर्ष

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘भारत हे एकच एक राष्ट्र पृथ्वीच्या पाठीवर आहे की, जे इतर देशांप्रमाणे क्रांती, बंड वा युद्ध यांतून निर्माण झालेले नाही, तर ऋषींच्या तपस्येतून निर्माण झाले आहे. चक्रवर्ती सम्राट भरत, ज्याची यशोगाथा देवही गातात, ज्याचे कर्तृत्व, त्याग, प्रजावत्सलता, धर्माचरण, शास्त्रनिष्ठा, पराक्रम आणि विनय यांना तुलना नाही, त्या चक्रवर्ती भरतामुळे या पुण्यभूमीला ‘भारतवर्ष’ हे नाव मिळाले. भरताच्या आधी या देशाचे नाव ‘अजनाभ वर्ष’ होते. अजनाभ हा परमश्रेष्ठ चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. त्याचे नाव या राष्ट्राला मिळाले. भरत त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ म्हणून भारतवर्ष. या भरत सम्राटाचा एक पूर्वज चक्रवर्ती चित्ररथ. त्याने संपूर्ण पृथ्वी कह्यात घेतली आणि मानवजमातीला वसाहती योग्य बनवून दिली. याचाच अर्थ आजच्या युरोपियन, अमेरिकन, रशियन, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन अशा सर्व पृथ्वीवरच्या जमातींना आमच्या आर्य पूर्वज सम्राटाने वसाहतीकरिता भूमी दिली आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २०.११.२००८)