लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी धर्मांध सरकारी कर्मचार्याने हिंदु युवकावर धर्मांतरासाठी दबाव टाकला !
|
लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) – येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (ए.डी.एम्.) कार्यालयातील एका कर्मचार्याने विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हिंदु युवकाला मुसलमान होण्यासाठी दबाव टाकला. याविषयी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्या कर्मचार्याला फटकारले आणि १ घंट्याच्या आत युवकाला विवाहाचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला.
१. शहरातील काशीनगर भागातील तरुण गुप्ता आणि एक मुसलमान युवती यांनी एकमेकांच्या सहमतीने विवाह करण्याचे ठरवले. त्यानंतर न्यायालयीन विवाह करण्यासाठी त्यांनी ए.डी.एम्.कडे आवेदन दिले; मात्र युवकाला विवाहाचे प्रमाणपत्र देण्यास तेथील महंमद साजिद या सरकारी कर्मचार्याने टाळाटाळ केली. त्याने त्या युवकासमोर ‘जर तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे असेल, तर त्याला मुसलमान झाले पाहिजे’, अशी अट ठेवली आणि ‘धर्मांतर केल्यावरच प्रमाणपत्र दिले जाईल’, असे सांगितले.
२. यासंदर्भात पीडित युवकाने तेथील जिल्हाधिकारी महेंद्र बहादूर सिंह यांच्याकडे तक्रार केली. याविषयी त्याने जिल्हाधिकार्यांना एक चित्रफित दाखवली. त्यात सरकारी कर्मचारी पीडित युवकावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी सरकारी कर्मचार्याला बोलावून फटकारले. तसेच त्याला निलंबित करण्याची चेतावणी दिली.