१३५ जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या सिद्धतेत ! – गुप्तचर यंत्रणेची माहिती
|
नवी देहली – भारत आणि पाक यांच्यामध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानंतर नियंत्रण रेषेवर शांतता आहे; मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या माहितीनुसार जवळपास १०४ ते १३५ आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने सिद्ध केलेल्या ‘लाँच पॅड’वर (प्रशिक्षित आतंकवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी एकत्र आणल्याचे ठिकाण) दबा धरून बसले आहेत. सीमा सुरक्षा दलाकडून त्या आतंकवाद्यांच्या हालचाली आणि इतर कारवायांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक बाबू सिंह यांनी मुख्यालयातील वार्षिक संमेलनात दिली.
Our inputs suggest that there are 104 to 135 militants at the launch pads, who are ready to infiltrate into this side: IG #BSF Kashmir frontier Raja Babu Singh#JammuKashmir https://t.co/3TudL2NSKm
— Zee News English (@ZeeNewsEnglish) January 24, 2022
वर्ष २०२१ मध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या जवळपास ५८ घटना समोर आल्या असून त्यामध्ये ५ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. २१ जण पळून गेले, तर एकाने शरणागती पत्करली. वर्ष २०२० मध्ये ३६ आणि वर्ष २०१९ मध्ये घुसखोरीच्या १३० घटना समोर आल्या आहेत.