खरा प्रजासत्ताक वर्धापनदिनाचा आनंद ।
२६ जानेवारी २०२२ या दिवशी ‘प्रजासत्ताकदिन’ आहे त्यानिमित्ताने…
चित्र असते कागदावर पंचपक्वांन्नाच्या ताटाचे ।
ग्रहण करता येत नाही कुणाला त्या पक्वान्नांचे ।। १ ।।
तसा होता अनेक वर्षे आपुला प्रजासत्ताक दिन ।
काँग्रेसच्या राज्यात वागवले केवळ हिंदूंना हीन-दीन ।। २ ।।
बहुसंख्यांक हिंदू असूनही ते हिंदुस्थानात निधर्मी ।
अन्य धर्मियांचे मात्र कौतुक अन् लाड जणू तेच देशातील स्वधर्मी ।। ३ ।।
भारतातील आणि चर्च मशिदी यांचे का होत नाही सरकारीकरण ।
हिंदूंच्या मंदिरांचे मात्र बिनदिक्कतपणे होत आहे सरकारीकरण ।। ४ ।।
भारताचे पहिले पंतप्रधान म्हणाले, ‘मी अपघाताने हिंदु ।’
छत्रपती शिवरायांना लुटारू म्हणाले, जे हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू ।। ५ ।।
त्यांचेच नातू राजीव गांधी नेहरूंची ‘री’ ओढत म्हणाले, ‘संस्कृत ही मृतभाषा ।’
देववाणी संस्कृत कशी कळेल, ज्यांना आहे अहंकार आणि सत्तेची नशा ।। ६ ।।
त्यांचेच पणतू राहुल गांधी यांचे तर काही कळतच नाही ।
नसलेले हिंदुत्व त्यांचे उफाळून येते, असते जेव्हा निवडणुकीची घाई ।। ७ ।।
अशा हिंदुत्वविरोधकांनी केले प्रदीर्घ काळ भारतावर शासन ।
तद्वत त्यांनी सदैव केले देश-धर्म विरोधकांचे लांगूलचालन ।। ८ ।।
अशा भारतीय शासनाचा दीर्घकाळचा प्रजासत्ताकदिन ।
अर्थहीन पुरुषार्थहीन तो केवळ शासकीय उत्सवदिन ।। ९ ।।
परंतु आता केला जात आहे आदर भारतीय संस्कृतीचा ।
आचार-विचार-उच्चारांतून दिसू दे आता खरा प्रजासत्ताक वर्धापनदिनाचा आनंद ।। १० ।।
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ६१ वर्षे), कोलगांव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१२.१.२०२२)