‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेल्या पुणे येथील धर्माभिमानी सौ. पौर्णिमा रावेलकर यांना आलेली अनुभूती
घरातील व्यक्तींना कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात भरती झाल्यावर तेथील वातावरणात साधनेमुळे स्थिर रहाता येणे : ‘माझ्या यजमानांना कोरोना झाल्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी केली. त्यात माझ्या सासूबाईंना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्या वेळी शासकीय रुग्णालयातील अनुभव ऐकून मला भीती वाटत होती. त्या कोरोनाबाधित झाल्यावर कुणीही नातेवाईक आमच्या साहाय्याला आले नाही. त्या वेळी आम्हा तिघांना पाचगणी येथील रुग्णालयात अलगीकरण कक्षात ठेवले. रुग्णालयातील अन्य रुग्ण आणि तेथील वातावरण नकारात्मक जाणवत होते. आम्हाला दिलेला कक्ष अस्वच्छ होता. त्यामुळे सासूबाईंना उलट्यांचा त्रास होऊ लागला. मी तेथील स्वच्छता करून यजमान आणि सासूबाई यांच्याकडून कापूर अन् अत्तर यांचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करवून घेत होते. मी त्यांना नामजपाची आठवण करून देत असे. मी भ्रमणभाषवर सतत नामजप लावून ठेवला होता. यामुळे माझ्या मनातील भीती न्यून झाली. मला परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी मलाही कोरोना झाल्याचा चाचणी अहवाल आला. त्या वेळी मला ईश्वरानेच साहाय्य केले. त्या परिस्थितीतही केवळ साधनेमुळे मला स्थिर रहाता आले.’
– सौ. पौर्णिमा रावेलकर, (ऑनलाईन सत्संगात सहभागी झालेल्या धर्माभिमानी) (जानेवारी २०२१) भोर, शिरवळ, पुणे.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |