‘सनातनच्या लघुग्रंथांच्या छपाईचे कार्य ईश्वरच करवून घेतो’, याची साधकाला आलेली प्रचीती
१. सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या कालावधीत अचानक लघुग्रंथांची मागणी अनेक पटींनी वाढणे
‘सनातन संस्थेच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या कालावधीत सनातनच्या लघुग्रंथांची मागणी अनेक पटींनी वाढली. अकस्मात् वाढलेल्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात लघुग्रंथ छपाईसाठी आले. यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा कागद कोल्हापुरातील कागद विक्रेत्यांकडे लगेच उपलब्ध होत नव्हता.
२. एका कागद विक्रेत्याने मागणी न करताही चुकून कारखान्यातून त्याच्याकडे सनातन संस्थेला छपाईसाठी लागणारे कागद आल्याचे सांगणे आणि त्याने ते स्वस्त दरात उपलब्ध करून देणे
या कागदांची मागणी करण्यासाठी मी एका कागद विक्रेत्यांकडे गेलो असता ते मला म्हणाले, ‘‘माझी एक विनंती आहे. आम्ही कागदाच्या कारखान्यातून मागणी केलेल्या कागदांत चुकून सनातन संस्थेला छपाईसाठी लागणारे कागद आले आहेत. ते तुम्हाला लागणार असतील, तर तुम्ही घ्या. तुम्हाला लागत नसतील, तर आम्ही ते कारखान्यात परत पाठवणार आहोत.’’ आम्ही आम्हाला लागणारे कागद त्यांच्याकडून लगेच विकत घेतले. त्यांनी आम्हाला ते अल्प दरात उपलब्ध करून दिले. टंचाईच्या काळातही आवश्यक असतांना अचानक ग्रंथ छपाईसाठी कागद उपलब्ध झाल्याने आम्ही ग्रंथ छपाई लवकर चालू करू शकलो.
त्या वेळी गुरूंच्या चरणी कृतज्ञता वाटून पुष्कळ आनंद झाला आणि ‘आमच्याकडून देवच ग्रंथ सेवा करवून घेतो’, हे मला अनुभवता आले.’
– श्री. संतोष गावडे, कोल्हापूर सेवाकेंद्र (२५.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |