नांदेड येथे भूमी विकून शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभे केले !

नांदेड – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इटग्याळ गावात शिवसैनिक संजय इटग्याळकर यांनी वडिलोपार्जित २ एकर भूमीची विकून आणि १४ लाख रुपये व्यय करून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभे केले आहे.

(सौजन्य : Sakal (सकाळ))

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येणार्‍या संजय इटग्याळकर यांना बालपणापासूनच बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वासाठीच्या लढ्याचे आकर्षण होते. बाळासाहेबांची हिंदुत्वाविषयीची जागरूकता ही तरुण पिढीपर्यंत पोचावी, यासाठी वर्ष २०१३ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचा पुतळा उभा केला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत एक ज्योत तेथे नेहमी तेवत असते. तिथेच आता त्यांनी हे मंदिर उभारले आहे. इटग्याळकर हे उदरनिर्वाहासाठी देगलूर, मुखेड आणि उदगीर याठिकाणी तरुणांना कराटे प्रशिक्षण देतात; पण कोरोना आणि दळणवळण बंदीमुळे हे प्रशिक्षण बंद झाले आणि आर्थिक आवक बंद पडली. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित २ एकर भूमीची विक्री करून जवळपास १ एकर परिसरात विस्तीर्ण अशा जागेत हे मंदिर उभा केले आहे. याठिकाणी विनामूल्य कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.