‘आपलाच दाम खोटा’ ठरत असल्याने धर्मशिक्षणाची आणि हिंदूंनी सर्व भेद विसरून संघटित होण्याची आवश्यकता !
नाशिक येथील एका श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह मुसलमान युवक असिफ याच्याशी झाला. ‘हा विवाह लव्ह जिहाद आहे किंवा नाही’ हे कालांतराने कळेल; तरीही या विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा विषय चर्चेत आला. ‘लव्ह जिहाद’ या विषयाची व्याप्ती आणि विविध पैलू लक्षात आणून देणारी ही लेखमालिका ‘असे विवाह म्हणजे एक प्रकारे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न कसा आहे ?’, हे लक्षात आणून देईल !
मागील भागात आपण धर्मांतरित मुसलमान हे अधिक कडवे हिंदुद्वेषी असल्याची उदाहरणे पाहिली. लव्ह जिहादच्या माध्यमातून एक प्रकारे धर्मांतर होत असल्याने ते घातक ठरते, हे त्यावरून लक्षात आले. आज त्यापुढील सूत्रे पाहू.
(भाग ६)
भाग ५. धर्मांतरित बाटगे सर्वाधिक कडवे ! वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/544740.html
लेखक – शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.
लव्ह जिहाद फोफावण्यास हिंदु मुलीही कारणीभूत !
लव्ह जिहादवरील यापूर्वीच्या लेखात मी म्हटले होते, ‘हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्या आंतरधर्मीय विवाहास केवळ मुसलमानांना उत्तरदायी धरता येणार नाही. ते हिंदु मुलींना त्यांच्या जाळ्यात फसवून त्यांच्या लोकसंख्येत वाढ करण्याच्या उद्देशपूर्तीसाठी नेटाने काम करत आहेत. त्याविषयी त्यांचा मुसलमान समाज हिंदु मुलीला प्रेमजाळ्यात अडकवणार्या तरुणाच्या मागे दृढतेने उभा रहातो. ‘आपलाच दाम खोटा आहे’, त्याला काय करणार ? अमीर खानने दोन हिंदु बायकांना घटस्फोट दिला. कदाचित् त्याने तिसरा विवाह करण्याचा मनोदय व्यक्त केलाच, तर अनेक हिंदु मुली अमीरची ‘तिसरी बेगम’ बनण्यास आनंदाने सिद्ध होतील, यात मला तरी शंका नाही.
चित्रपटातील मुसलमान अभिनेते हिंदु मुलींचे आदर्श !
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व मुसलमान अभिनेते आजच्या हिंदु तरुणींचे आदर्श बनले आहेत. मध्यंतरी माझ्या एका मित्राने मला सांगितले की, तो एका हिंदु मुलींच्या वसतीगृहात काही कामानिमित्त गेला होता. तेव्हा त्याला अनेक मुलींच्या खोल्यांमध्ये शाहरूख, सलमान इत्यादी मुसलमान अभिनेत्यांची छायाचित्रे भिंतींवर लावलेली दिसली. आमच्या हिंदु मुलींचे ‘आदर्श’ असे अभिनेते असतील, तर त्या ‘लव्ह जिहाद’ला का बळी पडणार नाहीत ?
हिंदूंच्या पैशांतून वर आलेल्या प्रियांका चोप्राला अजानचा आवाज आवडत असणे !
आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असणार्या निक जोन्स या ख्रिस्ती गायकाशी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने विवाह केला. अर्थात् तिने कुणाशी विवाह करावा, हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण ती एकदा म्हणाली होती की, तिला ‘अजानचा आवाज फारच आवडतो.’ ज्या लाखो हिंदु रसिकांनी तिला डोक्यावर घेऊन पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा इत्यादींचे अमाप दान तिच्या पदरात टाकले त्या हिंदूंच्या देवतांची भजने, आरत्या, प्रार्थना इत्यादी तिला आवडल्याचे तिने कधी म्हटल्याचे ऐकीवात आले नाही. एखाद्या मुसलमान अभिनेत्रीने असे म्हटले असते, तर त्यात काही वावगे वाटले नसते; पण जन्माने हिंदु असणार्या अभिनेत्रीनेही असे म्हणावे ?
६७ व्या वर्षी लव्ह जिहादला बळी पडून ‘हिंदु धर्मात स्त्रियांवर अत्याचार होतात’ असे विधान करणार्या लेखिका कमला दास !
साधारण २० वर्षांपूर्वी इंग्रजी आणि तमिळ भाषेतून अश्लील अन् प्रक्षोभक लिखाण करणार्या कमला दास या लेखिकेने वयाच्या ६७ व्या वर्षी इस्लाम स्वीकारून ‘सुरैय्या बेगम’, असे नाव धारण केले. हे धर्मांतर करतांना त्यांनी ‘हिंदु धर्मातील स्त्रियांवर कसे अत्याचार होतात आणि मुस्लिम पंथात स्त्रियांना कसा सन्मान मिळतो’, याचा प्रचार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. ‘हिंदु समाजातील अशा विकृत महिलांना काय म्हणावे ?’, हेच समजत नाही. ८ ते १० वर्षांपूर्वी ‘फेसबूक’वरून मैत्री झालेल्या, पहिल्या हिंदु पतीपासून दोन वर्षांची एक मुलगी आणि आमदार असलेल्या रुमी नाथ या तरुणीने जैकी जाकीर या एका शासकीय कर्मचार्याशी बांगलादेशात जाऊन निकाह लावल्याचे प्रकरण फारच गाजले होते. निकाह लावण्यापूर्वी तिने इस्लाम स्वीकारून रुबी नावही धारण केले होते.
देहलीच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची लव्ह जिहादला बळी पडलेली कन्या !
लव्ह जिहादच्या जाळ्यात केवळ गरीब आणि अज्ञानी मुलीच फसतात, असे नाही, तर श्रीमंत, सुशिक्षित आणि तथाकथित घरंदाज घराण्यातील मुलीसुद्धा फसत चालल्या आहेत. देहलीच्या दिवंगत मुख्यमंत्री ज्या अत्यंत राजकारणपटू आणि मुत्सद्दी म्हणून ओळखल्या जात. सातत्याने १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहून एका स्त्रीने इतका प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपदावर रहाण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता, त्या शीला दीक्षित यांची मुलगी लतिका यांना दीक्षितांचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणार्या सईद महंमद इम्रान याने लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याने तिच्याशी विवाह करून तो शीला दीक्षित यांचा जावई बनला; पण पुढे सईदने आपले खरे रूप प्रकट केले. तो लतिकाचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. असे म्हणतात की, त्याने एक दिवस शीला दीक्षित यांच्या घरातील सर्व सोने-नाणे घेऊन पळ काढला. पुढे लतिकाने त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा खटला प्रविष्ट केला आणि सईदला अटक झाली.
महिला मंत्र्याला डावलून मुसलमान जावयाला मंत्रीमंडळात स्थान देणारे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन् !
केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पी. विजयन् यांचेही जावई मुसलमान आहेत. त्यांची मुलगी वीणा हिने ‘डेमॉक्रॉटिक यूथ फेडरेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष पी.ए. महंमद रियाझ यांच्याशी विवाह केला. आता ते आमदार आहेत. ‘पी. विजयन् यांनी त्यांच्या पूर्वीच्या मंत्रीमंडळात चांगले काम करणार्या एका महिला मंत्र्याला डावलून त्यांच्या स्थानी त्यांच्या मुसलमान जावयाला आमदारकीचे तिकीट दिले’, असा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे ज्यांचे जावई मुसलमान आहेत, मुख्यमंत्री उच्चभ्रू हिंदु कुटुंबातील आहेत.
पाकिस्तानातील मुलींनी भारतातील केवळ मुसलमान मुलांशी निकाह (लग्न) करण्याची सिद्धता दर्शवणे आणि भारतात अनेक हिंदु मुलींनी मुसलमान मुलांशी नोंदणी विवाह करणे !
नुकतेच ‘व्हॉटस्ॲप’वर माझ्या पहाण्यात एक ‘व्हिडिओ’ आला. त्यात पाकिस्तानमधील अनेक मुलींना ‘‘तुम्ही भारतीय मुलाशी विवाह करण्यास सिद्ध आहात का ?’’ हा एकच प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सर्वच मुलींनी एकच उत्तर दिले की, ‘‘हो, आम्ही भारतीय मुलाशी विवाह करायला सिद्ध आहोत; पण आमची एकच अट आहे, तो मुलगा मुसलमान असला पाहिजे.’’ या चलचित्रानंतर माझ्या ‘व्हॉटस्ॲप’वर दुसरी एक ‘पोस्ट’ आली. त्यामध्ये ३० हिंदु मुलींची सूची देण्यात आली होती. या ३० ही हिंदु मुलींनी त्या मुसलमान मुलांशी नोंदणी पद्धतीने विवाह करणार असल्याचे एका मासाचे सूचनापत्र नोंदणी पद्धतीने विवाह करणार्या कार्यालयास दिले होते. मुसलमान आणि हिंदु मुलींमध्ये असे आकाश-पाताळाएवढे अंतर आहे.
हिंदूंना धर्माचे आणि गौरवशाली इतिहासाचे माहात्म्य ठाऊक नसल्याने हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडणे !
लव्ह जिहादला हिंदु मुलीच का बळी पडतात ? मुल्ला-मौलवी आणि ख्रिस्ती पाद्री यांच्या जाळ्यात अडकून हिंदूच का धर्मांतर करतात ? कारण हिंदूंना आपल्या सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माचे ना माहात्म्य ठाऊक आहे, ना आपला गौरवशाली इतिहास. आपल्याच धर्माविषयी घोर अज्ञानी असणार्या हिंदूंना मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी त्यांच्या भारतावरील राजवटीत हिंदूंवर किती अनन्वित अत्याचार केले, या दोन्ही पंथियांची कट्टरता आणि क्रौर्यता किती टोकाची असते, याची काय माहिती असणार ?
मुसलमानांना लहानपणापासून धर्माची शिकवण मिळणे आणि हिंदूंची मुले मात्र ख्रिस्त्यांच्या निरर्थक इंग्रजी कविता म्हणत असणे !
मुसलमान मुलांना लहानपणापासूनच मदरशांमध्ये त्यांच्या पंथाची शिकवण दिली जाते. त्यांची मुले कुराणातील ‘आयते’ घोकतात आणि दुसरीकडे आमच्या हिंदु मुलांनी ‘जॉनी जॉनी येस पप्पा’ ही लहानपणापासून खोटे बोलणे शिकवणारी इंग्रजी कविता म्हणून दाखवली की, त्यांचे ‘मम्मी-डॅडी’ यांना धन्यता वाटते. हिंदूंच्या घरातील संस्कार लोप पावत चालले आहेत. घरातील दोन वर्षांच्या मुलांपासून ८० वर्षांच्या वृद्धांच्या हातात भ्रमणभाष (मोबाईल) आले आहेत. त्यावरील आभासी जगात सारे रममाण झाले आहेत. घरातील सदस्यांना एकमेकांशी संवाद साधण्यास वेळ उरला नाही.
घरात मुलांवर धर्माचे संस्कार होत नसणे; मात्र चित्रपटांविषयी मुलांना सर्व काही ठाऊक असणे !
घरातील आई-बाबांना चाकरी-उद्योगांमुळे मुलांवर संस्कार करायला वेळ मिळत नाही. मिळालाच तर तो भ्रमणभाषवर ‘चँटिंग’ करण्यात अथवा दूरचित्रवाहिन्यांवरच्या फालतू मालिका पहाण्यात घालवला जातो. घरातील लहान मुलांच्या कानावर ना घरी, ना दारी, ना शाळांमध्ये रामायण-महाभारतातील गोष्टी पडतात, ना कधी त्यांना स्तोत्र-प्रार्थना शिकवल्या जातात. त्यामुळे मुले महाविद्यालयात जायला लागली, तरी त्यांना प्रभु श्रीरामाच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानांची नावेही ठाऊक नसतात. त्यांना ना श्रीरामाच्या भावांची नावे सांगता येतात, ना रावणाचा आणि कंसाचा वध कुणी केला, हे सांगता येते. कोणत्याही खानाचा चित्रपट प्रदर्शित झाला, तर मात्र हिंदु तरुण-तरुणींच्या त्यावर उड्या पडतात, मग तिकीट ५०० रुपयांचे असो कि १००० रुपयांचे, ते त्यांच्या खिजगणतीतही नसते. या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदु देवीदेवता, सभ्यता इत्यादींची टिंगलटवाळी केली, तरी त्याचे सोयरसुतकही त्यांना नसते. आपला धर्म आणि इतिहासाची माहिती त्यांना असो कि नसो; पण नटनट्यांच्या खानदानाची अन् त्यांच्या प्रेमप्रकरणांची मात्र इत्यंभूत माहिती असते. ‘फेसबूक’वरून मैत्री होऊन आपल्या मुलीने एका अपरिचितासह घरातून पळून जाण्यापर्यंत पल्ला गाठला आहे, याचीही गंधवार्ता हिंदु आई-वडिलांना नसते. असा सर्व सावळा गोंधळ असतांना लव्ह जिहादला चाप बसणार तरी कसा ?
‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’, अशी हिंदु धर्माची अवस्था असणे !
अशा या विपरीत परिस्थितीत भर म्हणून कि काय, सध्या हिंदु समाजाच्या हिंदु असण्यापेक्षा स्वतःच्या जातीच्या, प्रांताच्या, भाषेच्या आणि राजकीय विचारसरणीच्या अस्मिता अधिक प्रखर झाल्या आहेत. आरक्षणाच्या समस्येमुळे जातीय सलोखा नष्ट होत चालला असून जातीय विद्वेष मात्र वाढत चालला आहे. प्रांताच्या, भाषेच्या आणि राजकीय विचारसरणीच्या संदर्भात जेव्हा वाद उद्भवतात, तेव्हा एक प्रांत दुसर्या प्रांताविरुद्ध, एक भाषिक दुसर्या भाषिकाविरुद्ध आणि एक राजकीय पक्ष दुसर्या पक्षाविरुद्ध कट्टर शत्रूंसारखे शड्डू ठोकून उभे रहातात. त्या वेळी त्यांच्यापैकी सर्वांनाच आपण सर्वजण ‘हिंदु’ आहोत, आपली सर्वांची मातृभूमी एकच आहे, या वास्तवाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. या द्वेषाग्नीत जन्माने हिंदु; पण मतांसाठी लाचार होऊन नेहमी हिंदुद्वेषाचा वसा घेतलेले नेते तेल टाकून आग भडकवत असतात. पूर्वी महंमद घोरीला आमंत्रित करून पृथ्वीराज चौहानाचा काटा काढणारा एखादा जयचंद असायचा. आज मात्र असे लक्षावधी ‘जयचंद’ भारतात निर्माण झाले आहेत; म्हणूनच एक कवी म्हणतो, ‘कोई पेड कटनेका किस्सा ना होता अगर कुल्हाडीका पिछला उसका हिस्सा ना होता ।’ ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’, अशी सध्या हिंदु समाजाची अवस्था आहे.
महाराष्ट्रातील प्रशासनाकडून लव्ह जिहादच्या संदर्भातील कायदा करण्याची अपेक्षा निरर्थक !
लव्ह जिहादचे भारतात दिवसेंदिवस वाढत असलेले प्रमाण आणि त्याला बळी पडलेल्या हिंदु मुलींना सोसाव्या लागणार्या हालअपेष्टा पाहून उत्तरप्रदेश अन् गुजरात या राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदे संमत केले आहेत. या दंडविधानांच्या अंतर्गत अपराध्याला कायमची अद्दल अशा शिक्षेचा समावेश आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील प्रशासनाकडून अशा दंडविधानाची अपेक्षा करणे म्हणजे बैल किंवा रेड्यापासून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे.
लव्ह जिहादच्या कायद्यापेक्षा हिंदु म्हणून संघटित होणे आणि घराघरांत धर्माचे संस्कार करणे अधिक प्रभावी ठरेल !
माझ्या मते कायद्यापेक्षा हिंदूंनी जात-पात, संप्रदाय, भाषा, सीमा, राजकीय मतभेद इत्यादी वाद विसरून ‘हिंदु’ म्हणून एकवटणे आणि घराघरांत हिंदु संस्कार जपणे, हा उपाय अधिक प्रभावी ठरील.
(समाप्त)
हे पण वाचा –
♦ ‘लव जिहाद’ रोकनेके उपाय तथा हिन्दू समाजको आवाहन
♦ लव जिहाद : हिन्दू युवतियों, स्त्रियों तथा अभिभावकों के लिए ध्यान में रखनेयोग्य सावधानियां
♦ लव जिहाद : हिन्दू युवतियो, झूठे प्रेमकी बलि चढकर आत्मघात न करो !
♦ ‘लव जिहाद’का प्रसार तेजीसे होनेके कुछ कारण
हे चारही लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.hindujagruti.org/hindi/hindu-issues/love-jihad