पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी तिरुप्पूर, तमिळनाडू येथे आयोजित केलेल्या ज्योतिष परिषदेत सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपस्थित रहाणे
१. सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी अन्नदान करण्याची आवश्यकता असून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आयोजित केलेल्या ज्योतिष परिषदेच्या वेळी कार्तिकपुत्री उपस्थित राहिल्यास अन्नदान केल्याचे फळ प्राप्त होईल’, असे सांगणे
‘चेन्नई येथे २५.२.२०२१ या दिवशी १७२ वे सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचन झाले. या जीवनाडीपट्टी वाचनात सप्तर्षींनी सांगितले, ‘गुरुदेवांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी अन्नदान करण्याची आवश्यकता आहे.’ २८.२.२०२१ या दिवशी नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी तिरुप्पूर, तमिळनाडू येथे एका ज्योतिष परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेसाठी येणार्या ४०० ते ५०० जणांना अन्नदान करण्यात येणार आहे. त्या वेळी कार्तिकपुत्री श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उपस्थित राहिल्यास अन्नदान केल्याचे फळ प्राप्त होईल.’ (पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे गेली ४० वर्षांपासून ज्योतिष परिषद भरवतात. ते ‘ऑल इंडिया ॲस्ट्रॉलॉजर असोसिएशन’चे अध्यक्ष आहेत.)
२. सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे ज्योतिष परिषदेला उपस्थित असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सन्मान करण्यात येणे
सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ज्योतिष परिषदेला उपस्थित होत्या. या ज्योतिष परिषदेचे मुख्य आयोजक श्री. राजेंद्रन् यांनी ज्योतिष परिषदेच्या दिवशी गुरुप्रतिपदा असल्याने ९ प्रमुख ज्योतिषांसाठी गुरुरूप म्हणून सन्मान समारंभ ठेवला होता. सन्मान समारंभाच्या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना व्यासपिठावर बोलावले. या वेळी ९ प्रमुख ज्योतिषांना मुकुट, दंड, माला, शाल, भेटवस्तू, ग्रंथ, पारितोषिक आदि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ज्योतिष परिषदेचे आयोजक श्री. राजेंद्रन् यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचाही सन्मान केला.’
क्षणचित्रे
१. ज्योतिषशास्त्र शिकणारे विद्यार्थी व्यासपिठावर सन्मान स्वीकारण्यासाठी आल्यावर आणि सन्मान झाल्यानंतर व्यासपिठावरून जातांना सर्वांचे आशीर्वाद घेऊन जात होते. अनेक विद्यार्थ्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचाही आशीर्वाद घेतला.
२. व्यासपिठावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शेजारी बसलेल्या एक स्त्री ज्योतिष विशारद श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना म्हणाल्या, ‘‘तुमचा तोंडवळा पुष्कळ सुंदर आहे. तुमच्या भोवती एक आध्यात्मिक वलय आहे.’’
– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (५.३.२०२१) ॐ
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |