कोल्हापूर येथे १० लाख रुपयांची लाच घेतांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील २ हवालदारांना अटक !
|
कोल्हापूर, २२ जानेवारी (वार्ता.) – कारवाईची भीती दाखवून १० लाख रुपयांची लाच स्वीकारणार्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील हवालदार विजय कारंडे आणि किरण गावडे यांना पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली आहे. वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ३ पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली आहे.